पोहण्यासाठी गेलेल्या चार पैकी दोघांचा मृत्यू, गोरख्याने दोघांना वाचवले

पोहण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरालगत असलेल्या वर्धा नदीमध्ये घडली. रुपेश खूळसंगे ( 13 ) वर्ष, प्रणय भोयर (15) वर्ष असे मृत मुलांचे नाव असून हे दोघे ही वरोरा शहरातील आहे.

वरोरा शहरात राहणारे चार मित्र पोहण्यासाठी वर्धा नदी येथील तुरणा घाटावर गेले होते. यादरम्यान नदीपात्रात खोल पाणी असल्याने हे चारही मित्र बुडायला लागले यावेळी तिथे असणाऱ्या गोराख्याने दोघांना वाचवले मात्र दोघेजण खोल पाण्यात गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस घटना स्थळी दाखल होत पोलीस रेस्क्यू टीम बोलावत मुलांचा शोध घेणे सुरू आहे.