ट्रक-दुचाकी अपघातात दोन युवक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जिंतूर

जिंतूर शहरातून लग्नासाठी साड्या, कपडे खरेदी करून गावाकडे परतणाऱ्या दुचाकीस्वारांची एका टँकरशी येलदरी रस्त्यावर समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

तालुक्यातील कोल्पा येथील राहणार गोपाल शेषराव सातपुते (१६), वैभव नारायण सातपुते (१७) हे दोघेही त्यांच्या कुटुंबीयांमध्ये हे आज शनिवार, २० एप्रिल रोजी लग्न असल्याने ते दोघे दुचाकी (एम.एच. २२ एच.ई.-३५ ६०) वर शुक्रवारी जिंतूर शहरात आले होते. खरेदी करून गावाकडे परत जात असताना रात्री ९.३० वाजता येलदरी रस्त्यावर शेवडी येथून पाणी भरून जिंतूर शहराकडे येत असलेला टँकर (एम.एच.१६ बी ५०७७) याची पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. या धडकेत गोपाळ शेषराव सातपुते हा युवक जागीच ठार झाला तर वैभव नारायण सातपुते याच्यावर प्राथमिक उपचार करून परभणी येथे नेत असताना तो रस्त्यामध्येच प्राणज्योत मालवली. या दोन्ही तरुणाच्या निधनाने कोल्पा गावावर शोककळा पसरली आहे.