रत्नागिरी – ट्रक-मोटारसायकलच्या अपघातातत दोघेजण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

हातखंबा-गणपतीपुळे मार्गावर मासेबाव येथे ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण ठार झाले. सूर्यकांत मारुती जाधव ( वय 50, रा.कारवांचीवाडी नॅनोसिटी, रत्नागिरी) आणि रवींद्र बबल्या धनावडे, (वय 41, रा.कारवांचीवाडी, पोमेंडी बुद्रुक रत्नागिरी) अशी मृतांची नावे आहेत.

सूर्यकांत जाधव आणि रवींद्र धनावडे हे दोघेजण होंडा शाईन एम एच 08 एए 8653 या दुचाकीवरून करबुडे येथून रत्नागिरीकडे निघाले होते. याचवेळी एम एच 45 1596 हा ट्रक जयगडला निघाला होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात जाधव यांच्या डोक्याला जोराचा मार लागला़ रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे ते जागीच ठार झाले. धनावडे हे दुचाकी चालवत होते. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती उपचारादरम्यान त्यांचे हॉस्पिटलमध्ये निधन झाले.