शोपियांमध्ये लश्करच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
army_jawan
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । श्रीनगर

देशभरात लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच जम्मू-कश्मीरमधील शोपियां भागात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या सशस्त्र चकमकीत जवानांनी ‘लश्कर-ए-तोयबा’च्या दोन कुख्यात दहशतवाद्यांना ठार केले. ही चकमक शोपियां भागातील हिंदसीतापूर येथे झाली. तेथे दहशतवादी लपले असल्याची खबर मिळताच 34 राष्ट्रीय रायफल्स, एसओजी आणि सीआरपीएफ जवानांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत या दोघांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलाच्या गोळीबारात गावात लपलेले दोन दहशतवादी ठार झाले. या दोघांचेही मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. खात्मा करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी होते.  या दोघांकडून अनेक अत्याधुनिक शस्त्र्ाs आणि इतर सामानही जवानांनी जप्त केले. बशारत अहमद आणि तारीक अहमद अशी त्यांची नावे असून ‘लश्कर-ए-तोयबा’च्या या दोन्ही हस्तकांचा पोलीस शोध घेत होते. विशेष म्हणजे तारीक अहमद हा आधी पोलीस ठाण्यात काम करत होता, मात्र नंतर त्याने दहशतवादाचा रस्ता धरला होता.