
सामना ऑनलाईन, मुंबई
भरधाव वेगातील अज्ञात वाहनांनी एकाच रात्रीत वेगवेगळ्या ठिकाणी दोघांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरील डॉक्टर प्रकाश मालदवा यांना गोरेगाव परिसरात एका वाहनाने चिरडले. तर मध्यरात्री दीडच्या सुमारास एका अवजड वाहनाने एक्स्प्रेसवेवर महादेव पाटोळे यांना चिरडले. गोरेगाव आरे कॉलनी येथे 48 वर्षीय डॉक्टर प्रकाश मालदवा रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी एका भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर काही तासांतच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर महादेव पाटोळे यांना एका अवजड भरधाव वाहनाने चिरडलं. 32 वर्षीय पाटोळे आपल्या एसयूव्हीमधून उतरत होते त्यावेळी एक गाडी त्यांना धडक देऊन निघून गेली. या दोघांनाही एकाच वाहनाने चिरडले का याचा शोध पोलीस घेत आहेत.





























































