
महाराष्ट्रात आज आणखी 2 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण पुणे येथील आणि दुसरा लातूर येथील आहे. पुण्यातील रुग्ण 39 वर्षाची महिला आहे, तर लातूरमधील रुग्ण 33 वर्षाचा पुरुष आहे. दोन्ही रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. सध्या दोघेही विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या प्रत्येकी 3 निकटसहवासितांची चाचणी करण्यात आली. त्यांचे कोविड रिपोर्ट निगेटिक्ह आले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले होते.



























































