विमानात सिगारेट ओढणार्‍या दोघांना अटक, कोलकाता-मुंबई प्रवासातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानाच्या शौचालयात सिगारेटचे झुरके मारणार्‍या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. सब्जी कलाम आणि रोनी कलाम अशी त्या दोघांची नावे आहेत. न्यायालयाने त्या दोघांची जामिनावर सुटका केली.

 

सब्जी आणि रोनी हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. गुरुवारी रात्री ते दोघे कोलकाता–मुंबई असा विमान प्रवास करत होते. प्रवासादरम्यान शौचालयात कोणी तरी सिगारेट पीत असल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर क्रूने शौचालयात कोण गेले याचा शोध घेतला. तेव्हा सब्जी आणि रोनी हे जागेवर नसल्याचे क्रूच्या निदर्शनास आले. त्या दोघांकडून माचीस आणि सिगारेटचे पाकीट जप्त केले. विमान मुंबईत आल्यावर याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या अधिकाऱयांना देण्यात आली. त्या दोघांना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघाविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.