जम्मू-कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या बांदीपोरा भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. या परिसरात शोधमोहीम सुरू असताना येथील लावदारा गावात दहशतवादी लपल्याची सूचना सुरक्षा दलांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी तपास केला तेव्हा लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानी जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या भागात अजूनही शोधमोहीम सुरू असून काही ठिकाणी चकमकी झडत आहेत.