मालाड रेल्वे स्थानकात दुचाकी वाहनतळ सुरू, शिवसेनेच्या मागणीला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड रेल्वे स्थानक पूर्व येथे प्रवाशांसाठी दुचाकी वाहनतळ सुरू करण्यात आले आहे. यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे वाहनतळ सुरू व्हावे यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता. अखेर शिवसेनेच्या मागणीला यश आले आहे.

मालाड येथील कुरारगाव परिसरात सुमारे अडीच ते तीन लाख लोकवस्ती असून लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. परंतु परिसरात रेल्वे प्रशासनाची वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने जागा मिळेल तेथे पार्ंकग करण्यात येत होती व अवैधरित्या पार्ंकग पैलेली वाहने टोईंग करून नेल्यामुळे नागरिकांना आर्थिक दंड सहन करावा लागत होता. यामुळे परिसरात नेहमीच वाहतुकीची काsंडी होत होती. अनेकदा दुचाकी चालक रस्त्यावरच गाडी लावून दुकानात साहित्य घेण्यासाठी जातात. या वेळी वाहतूक काsंडीचा सामना करावा लागत असल्याने याचा त्रास नागरिकांनाच सहन करावा लागत असे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती येथील रहिवाशांनी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तीकर व आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू यांचेकडे केली होती.

नागरिकांच्या मागणीनुसार रेल्वे स्थानक विस्तारात दुचाकी वाहन तळाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी 2017 साली गजानन कीर्तीकर, सुनील प्रभू यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. या वेळी झालेल्या चर्चेमध्ये उपरोक्त ठिकाणी तातडीने वाहनतळ सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले. तसेच मालाड स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्या वेळी या वाहनतळाचेही सुसज्जीकरण करण्यात येईल, असा प्रस्ताव विभागीय रेल्वे प्रबंधकांकडे पाठविण्यात येऊन त्यास मंजुरी घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. याप्रसंगी खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सुनील प्रभू, नगरसेविका विनया सावंत, उपविभागप्रमुख विष्णू सावंत, संतोष धनावडे, नगरसेवक आत्माराम चाचे, पश्चिम रेल्वेचे अधिकारी अभय साने, आर.के. शर्मा, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  कटकपॉड, सहाय्यक महापालिका अभियंता अमित जाधव तसेच माजी नगरसेवक प्रशांत कदम, गणपत वारिसे, रिना सुर्वे, सुनील गुजर आदी उपस्थित होते.