ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला उच्च आणि तंत्रशिक्षण मिळण्यासाठी आराखडा तयार करणार- उदय सामंत

1557

ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च आणि तंत्रशिक्षण मिळाले पाहिजे याकरता आराखडा तयार करणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असावे यामागणीकडे मी आवर्जून लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उदय सामंत यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते सोपविण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानताना उच्च व तंत्रशिक्षण खाते सांभाळताना मुख्यमंत्री अपेक्षित असे काम करेन असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.पुढे ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना उच्च आणि तंत्रशिक्षण सुलभपणे कसे घेता येईल याकरीता विद्यापीठात काही नवे आमुलाग्र बदल करून त्याचा फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मिळेल यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

पुढे सामंत म्हणाले की, उच्च व तंत्रशिक्षण हे खाते विद्यार्थ्यांचे तरूणाच्या जवळचे आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे,तंत्रशिक्षण महाविद्यालयातील प्राध्यापकांचे आणि विद्यापीठातील प्रश्न सोडविण्यावर मी भर देणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या