
#MahaElection 2019 – खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम करत भाजपमध्ये प्रवेश झालेल्या सातारच्या उदयन राजे भोसले यांच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या घोषणेवेळी सातारच्या लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख घोषित न केल्याने गोंधळाचे वातावरण होते. मात्र आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तारीख घोषित करून संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयराजे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट आली आहे.
उदयन राजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तिथली जागा रिक्त झाली होती. विधानसभा निवडणुकांसोबतच या जागेसाठी पोटनिवडणूक लागेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाने विधानसभेच्या तारखा जाहीर करतेवेळी या पोटनिवडणुकीचा उल्लेख केला नाही. त्यामुळे संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण होते. अखेर आज निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकी प्रमाणेच 21 ऑक्टोबर रोजी सातारमध्ये मतदान होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
https://eci.gov.in/files/file/10635-schedule-for-bye-election-to-fill-one-casual-vacancy-in-the-45-satara-parliamentary-constituency-of-maharashtra/

साताऱ्यात शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना डिवचलं, वाचा सविस्तर…





























































