युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारा ‘तो’ ऐतिहासिक क्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
yuti-new

सामना ऑनलाईन । मुंबई

देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना-भाजप युतीवर वृत्तवाहिन्यांवर तुफान चर्चा सुरू आहे. सकाळ पासूनच या बातमीकडे सगळ्यांचे लक्ष होते. अखेर ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पोहोचले. त्यांनी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे एकाच गाडीतून हॉटेल ब्ल्यू सी येथे पत्रकार परिषदेसाठी निघाले. त्याचे चित्रण सर्व वाहिन्यांवरून दाखवण्यात आले. चौघेही एकाच गाडीतून प्रवास करत असल्याने सर्व मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. चौघांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य असलेला हा क्षण सर्वाधिक चर्चिला जात आहे. या प्रसंगातून युतीचे शुभसंकेत मिळाल्याचे सांगण्यात येत होते.