
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्र. 1 मधील दहिसर, बोरिवली, मागाठाणे विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे – विधानसभा समन्वयक – अवधूत जाधव (दहिसर विधानसभा वॉर्ड क्र. 1, 7), शाखाप्रमुख – किशोर म्हात्रे (दहिसर विधानसभा वॉर्ड क्र. 7), विधानसभा सह समन्वयक – नितीन कदम (बोरिवली विधानसभा वॉर्ड क्र. 9, 13, 16), सागर शिंदे ( बोरिवली विधानसभा वॉर्ड क्र. 15, 17, 18), उपविधानसभा समन्वयक – शंकर निर्वाण (मागाठाणे विधानसभा – वॉर्ड क्र. 3, 4).
























































