शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गोपीनाथ गडाला भेट देणार

3063

राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारी मराठवाड्यात येणार आहेत. गंगाखेड येथे ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून ते पुढे माजलगाव जाणार आहेत. माजलगावला जाण्यासाठी ते परळी वैजनाथ मार्गाने जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे याच मार्गावर असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला भेट देणार आहेत.

सामनाच्या टॉप बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

उद्धव ठाकरे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथगड येथे भेट देऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.गोपीनाथ गडावर यासाठीची सगळी तयारी करण्यात आली आहे. गोपीनाथ गडानंतर उद्धव ठाकरे पुढे माजलगाव येथे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत.

विधानभवनात शपथविधीची जोरदार तयारी

आपली प्रतिक्रिया द्या