उद्धव ठाकरे यांची तोफ आज धडाडणार, हिंगोलीत निर्धार सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून करण्यात आलेली गद्दारी, सत्तेच्या हव्यासापोटी भाजपने वेळोवेळी केलेला विश्वासघात, रोजगाराअभावी तरुणांची होत असलेली परवड, पावसाने दडी मारल्याने मराठवाडय़ावर आलेले दुष्काळाचे संकट आणि कुंभकर्णी झोपेत असलेले सरकार… या सर्व पार्श्वभूमीवर हिंगोलीत उद्या रविवारी शिवसेनेची महानिर्धार सभा होत आहे. सभेनिमित्ताने हिंगोलीच्या भव्य रामलीला मैदानावर अभूतपूर्व हिंदू जनसागर उसळणार असून, या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

हिंगोली हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा अंगार या भूमीत रुजला. 1985 पासून हिंगोलीत शिवसेनेचे तुफान घोंगावत आहे. गाव तेथे शाखा उभ्या राहिल्या. विधानसभा, लोकसभेवर शिवसेनेचे शिलेदार वाजतगाजत निवडून गेले. पण, गद्दारीची विषवल्ली फोफावली. हीच विषवल्ली उखडून फेकण्यासाठी शिवसेनेचा महाएल्गार रामलीला मैदानावर होत आहे.

स्थळ – रामलीला मैदान
वेळ – दुपारी 2 वाजता