
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले. प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या यशाचे तुम्ही सर्व मानकरी आहात; आता मजबुतीने, एकजुटीने काम करूया असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे तसेच शिवसेना नेते, उपनेते, सचिव, पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.



































































