
शहा आणि कंपनीला उद्धव ठाकरे व शिवसेनेचं नाव घेतल्याशिवाय घास घशाखाली उतरत नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. मातोश्री निवासस्थानी काही पक्षप्रवेश झाल्यानंतर आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं.
”शहा आणि त्यांच्या कंपनीला शिवसेना संपली असं वाटतं. पण शिवसेना कधीच संपणार नाही. त्यांना उद्धव ठाकरे व शिवसेनेचं नाव घेतल्याशिवाय घास घश्याखाली उतरत नाही. त्यांना महाराष्ट्र गिळायचाय म्हणून शिवसेना संपवायची होती. खऱ्या अॅनाकोंडाला सगळंच गिळायचं आहे. त्या अॅनाकोंडाला फक्त शिवसेना विरोध करते त्यामुळे त्याला शिवसेना नकोय”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



























































