
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. शनिवारी उद्धव ठाकरे हे परभणी जिल्ह्यात आले होते. यावेळी ढेंगळी पिंपळगाव गावातील एका शेतकरी महिलेने उद्धव ठाकरे यांच्यासमोर तिची व्यथा मांडली. यावेळी तिने मुलीला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे पैसे नाहीत असं सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्या महिलेला धीर देत तिच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना उचलणार असल्याचे जाहीर केले.
आम्हाला तुमचं नकोच, फक्त आमच्या हक्काचं द्या; शेतकरी महिलेने सरकारला सुनावले pic.twitter.com/NVeQSPAhxe
— Saamana Online (@SaamanaOnline) November 8, 2025
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलतोय पण एका अटीव. तुम्ही खचून जायचे नाही. मुलगी पास झाल्यावर पेढे घेऊन मातोश्रीवर यायचे खर्च शिवसेना करेल”. उद्धव ठाकरे यांनी मुलीच्या शिक्षणाचा खर्च स्वीकारल्याने त्या शेतकरी महिलेला गहिवरून आले व तिने त्यांचे आभार मानले.






























































