‘शिवसेना दैनंदिनी’चे दिमाखात प्रकाशन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी ‘शिवसेना दैनंदिनी 2025’चे प्रकाशन ‘मातोश्री’ निवासस्थानी दिमाखात करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकरदेखील उपस्थित होते. या दैनंदिनीची निर्मिती जी. एस. परब आणि विकास मयेकर यांनी केली असून यात शिवसेना नेते, उपनेते, प्रवक्ते, सचिव, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची माहिती आहे. शिवसेना दैनंदिनीची विक्री सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत (रविवार सोडून) शिवसेना भवन येथे होणार आहे.