ज्या सत्तेची भीती वाटते ती उलथवलीच पाहिजे! उद्धव ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर महाराष्ट्रातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. या कार्यकर्त्यांना मागर्दर्शन करतेवेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “सत्तेला घाबरणार असाल तर उपयोग नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती बदलण्याशिवाय पर्याय नाही. ती बदललीच पाहिजे. सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे. ज्या सत्तेची भीती वाटते ती उलथवलीच पाहिजे. त्यासाठीच आपण काम करत आहोत. यात आपण सहभागी होतायत त्यासाठी मी तुमचे स्वागत करतो. नवीन वर्ष आणि येणारी सगळी वर्षे ही देशाला आनंदाची, उत्साहाची, भरभराटीची आणि लोकशाहीची जावो.”