स्मार्टफोनमध्ये अचानक सेव्ह होतोय ‘हा’ नंबर, तुम्हीही एकदा पाहून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानातील लाखो स्मार्टफोनमध्ये अचानक एक नंबर सेव्ह होत असल्याने अनेकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये यूनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) हा टोल फ्री नंबर सेव्ह होत आहे. हे नक्की कशामुळे होत आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

युझर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये १८०० ३०० १९४७ (1800 300 1947) हा टोल फ्री क्रमांक आपोआप सेव्ह होत आहे. यूनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) हा जुना नंबर असून गेल्या दोन वर्षापासून फक्त १९४७ (1947) हा नंबर कार्यरत आहे, अशी माहिती युआडीआयने ट्वीट करून दिली आहे.

मोफत इंटरनेट आणि डिजिटल हक्कांसाठी काम करणारी संस्था एक्सेस नाऊसाठी काम करणारे आकाश सिंह यांनी हा क्रमांक मोबाईल मध्ये येण्याची चार कारणे स्पष्ट केली आहेत.

१. पहिले कारण म्हणजे जर तुमच्या मोबाईलमध्ये भीम, एम आधार आणि पेटीएम सारखे अॅप्स असतील तर त्यामुळे हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आलेला असेल

२. सिम विकत घेताना जर तुम्ही आधार क्रमांक दिला असेल तेव्हाही हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये आलेला असू शकतो.

३.फोनमध्ये तुम्ही अशा सेवेचा लाभ घेत असाल त्याच्याशी तुमचा आधार क्रमांक जोडला असेल उदा. मोबाईल बँकिंग अथवा फोन बँकिंग

४. चौथे कारण म्हणजे एखादी विदेशी कंपनीने लोकांचे मोबाईल ट्रॅक करण्यासाठी आणि त्यांचे प्रोफाईलिंग करण्यासाठी या क्रमाकांचा समावेश मोबाईलमध्ये केला असावा.

uidai01