Ukraine Russia War – युद्धभूमीवर युक्रेनी सैनिक अडकले लग्नबंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाने युक्रेनवर हल्ला करून 11 दिवस झाले आहेत. दररोज रशिया युक्रेनचा थोडा थोडा भाग उद्ध्वस्त करत आहे. युक्रेनी सैनिक देखील मागे न हटता रशियाला मूँह तोड जवाब देत आहेत. युक्रेनी सैनिकांसाठी जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच दोन युक्रेनी सैनिकांनी युद्धभूमीवर एकमेकांसोबत लग्न केले आहे.

युक्रेनी लष्करातील लेस्या व वालेरिय हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. ते दोघेही 112 ब्रिगेड ऑफ टेरिटोरियल डिफेन्सचे सैनिक आहेत. क्विव पोस्टने याबाबत वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी युक्रेनमधील ओडेसा शहराच्या बॉम्ब शेल्टरमध्ये एका जोडप्याने लग्न केले होते. क्लेवेट्स व नातालिया असे त्या जोडप्याचे नाव होते. बेलारुसच्या मीडियाने त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल केले होते.