INDvENG कोरोनामुळं पंचांना करावं लागतंय एक्स्ट्रा काम, प्रत्येक षटकारानंतर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लंडनच्या ओव्हल मैदानावर हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना सुरू आहे. हिंदुस्थाच्या संघाने 250 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये हिंदुस्थानने रविंद्र जाडेजा, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहली यांच्या विकेट्स गमावल्या. अजिंक्य रहाणेला पंचांनी दोनदा बाद दिले. एकदा डीआरएसमुळे तो वाचला, मात्र दुसऱ्यांदा त्याचा बळी गेला.

पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेमध्ये पंचांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र कोरोनामुळे पंचांना एक्स्ट्रा काम करावे लागत आहे. खेळाडूंनी षटकार ठोकल्यानंतर पंचांना चेंडू निर्जंतूक करावा लागत आहे. कारण षटकार खेचल्यांनतर चेंडू प्रेक्षकांमध्ये जात असून प्रेक्षक आपल्या हातांनी चेंडू पुन्हा मैदानात फेकतात. या दरम्यान प्रेक्षकांमधील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली असेल तर कोरोनाचा विषाणू खेळाडूंपर्यंत पोहोचू नये यासाठी मैदानावरील पंच हातात ग्लोअज घालून चेंडू निर्जंतूक करत आहेत.

INDvENG ‘हिटमॅन’ रोहितने केला खास विक्रम, ‘द वॉल’ द्रविडसह गॉर्डन ग्रीनिजला सोडलं मागे

दरम्यान, कोरोनामुळे क्रिकेटमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहेत. पूर्वीप्रमाणे गोलंदाजाला आता चमक कायम राखण्यासाठी चेंडूला थुंकी लावता येत नाही. तसेच गोलंदाज गोलंदाजीला आल्यावर आपली टोपी, गॉगल, स्वेटर पंचांकडे देत होता. मात्र आता गोलंदाजाला असे न करता आपल्या गोष्टी संघातील इतर खेळाडूकडे सोपवाव्या लागत आहेत.

INDvENG – टीम इंडियाला धक्का, मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह