
कर्मचारी भविष्य निधी संघटन (ईपीएफओ)ने आपल्या कोटय़वधी खातेदारांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कर्मचाऱयांवर जर कठीण परिस्थिती आली तर त्या कर्मचाऱयाला 100 टक्के पीएफ काढता येईल. यासाठी ईपीएफओकडून नियमात बदल केला आहे. या बदलामुळे क्लेम रिजेक्ट कमी होतील. तसेच कर्मचाऱयांना वेळेत आर्थिक मदत मिळेल, असे ईपीएफओकडून सांगण्यात आले आहे.
नोकरीवरून काढून टाकणे, कर्मचारी कपातीत नोकरी गेल्यास ही प्रकरणे कोर्टात प्रलंबित आहे. तरीही ते पीएफ काढण्यास पात्र असतील. ही सुविधा केवळ विशेष परिस्थितीसाठी असेल. सामान्य परिस्थितीसाठी ही रक्कम 75 टक्के काढता येते.
– कोणत्याही कर्मचाऱयाला जर दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ वेतन मिळाले नाही तर तो कर्मचारी 100 टक्के पीएफ काढू शकतो.
– काही खास परिस्थिती कर्मचाऱयांना 100 टक्के पीएफ काढण्याची परवानगी दिली जाईल. यामध्ये जर ज्या कंपनीत लॉकआऊट झाला किंवा ती पंपनी बंद पडली आणि कर्मचाऱयांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळाली नसेल तर तो कर्मचारी आपला 100 टक्के पीएफ काढू शकतो.


























































