जगातील महालसीकरणासाठी युनिसेफ होतेय सज्ज! 52 कोटी इंजेक्शन सिरिंज आणि 1 अब्ज सुया साठवण्याची तयारी

गेले काही महिने आपल्या प्रभावाने जग ठप्प करून सोडणाऱया कोरोनाला निरोप देण्याची वेळ आल्याचे संकेत संयुक्त राष्ट्रांनीही दिले आहेत. जगभरातील देशांत तयार होणाऱया कोरोना प्रतिबंधक लसींचे वितरण आणि त्यांच्या सुरक्षित साठय़ासाठी युनिसेफनेही पंबर कसली आहे.

गेली अनेक वर्षांचा साथीच्या रोगांसाठीच्या लसीकरणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या युनिसेफच्या अधिकाऱयांनी सुमारे 52 कोटी (अर्धा अब्ज) सिरिंज आणि 1 अब्ज इंजेक्शनच्या सुया साठवण्यासाठी सुसज्ज गोदाम उभारण्याची तयारी वेगाने सुरू केली आहे.

जगातील कोविड -19 वरील लसी यशस्वी चाचण्यांनंतर 2021 मध्ये प्रत्यक्ष लसीकरणासाठी येतील तेव्हा मोठय़ा संख्येने सुरक्षित सिरिंजस आणि सुयांची गरज भासणार आहे. त्यांचा पुरवठा युनिसेफ करणार आहे. शिवाय लसींच्या जागतिक वितरणाचा आराखडा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी सहकार्य करणार आहेत.

कोरोना महामारीची जगभरातील व्याप्ती पाहता कोरोना प्रतिबंधक लसींचे लसीकरण हा जगाच्या इतिहासातील मानवी महालसीकरण उपक्रम ठरणार आहे. मात्र जगातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता या विषाणूच्या प्रतिबंधासाठी सुमारे अर्ध्या अब्जाहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचावी लागणार आहे.

त्यासाठी लागणाऱया सिरिंज आणि सुयांचा तुटवडा पडू नये यासाठी युनिसेफने हायटेक असे गोदाम उभारण्याच्या कामाला वेगाने सुरुवात केली आहे. पुढच्या वर्षी जशी मागणी येईल तसा जगभरात या सिरिंज आणि सुयांचा वेगाने पुरवठा युनिसेफ करणार आहे.

युनिसेफचे उद्दिष्ट 1 अब्ज सिरिंज पुरवण्याचे

युनिसेफने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सुमारे 62 कोटी इंजेक्शन्स सिरिंज आणि 1 अब्ज सुया खरेदीची तयारी केली आहे. आपत्कालीन वेळेत लसीकरणासाठी सिरिंज कमी पडू नये यासाठी संयुक्त राष्ट्रे प्रयत्नशील आहेत. कोरोनासाठी 52 कोटी आणि देवी, टायफॉईड व अन्य साथीच्या आजारांसाठी 10 कोटी सिरिंज युनिसेफ तयार ठेवणार आहे.

या खरेदीची तयारी आतापासूनच सुरू आहे. कारण कोरोनाच्या लसी बाजारात आल्या की त्या तत्काळ जगभरात लसीकरणासाठी पोचवणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. मात्र लसीकरणाचा जागतिक अनुभव असणाऱया युनिसेफने हे आव्हान पेलण्याची तयारी केली आहे. त्यामुळे गरीब देशांना परवडणाऱया दरात अथवा सेवाभावी संस्थांच्या मदतीने
कोविड -19 प्रतिबंधक लस मिळवता येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या