राव यांचा आडमुटेपणा सुरूच, बेस्ट कामगारांच्या वेतन करारावर स्वाक्षर्‍या करण्यास नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टने कामगारांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर पाच ते बारा हजार वेतनवाढ मिळण्याच्या परस्पर सामंजस्य करारावर सही करण्यास बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने स्वाक्षर्‍या करण्यास नेते शशांक राव यांनी नकार देत आपला आडमुठेपणा कायम ठेवला आहे. बेस्ट संयुक्त कृती समितीने औद्योगिक कलह कायद्यानुसार बेस्टला पुन्हा संपाची नोटीस देण्याची तयारी चालविली आहे. बेस्ट कृती समितीने मध्यंतरी वेतनकरारासाठी बेमुदत उपोषणाचे छेडलेले आंदोलन गणपती उत्सव संपेपर्यंत मागे घेतले होते. आज समितीच्या परळ येथे पार पडलेल्या बैठकीत बेस्ट उपक्रमास संपाची कायदेशीर नोटीस देण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला आहे. बेस्ट कामगार सेनेने मान्य केलेला हा सामंजस्य करार कामगारांसाठी घातक, नुकसानकारक असल्याची भूमिका समितीने सोमवारी स्पष्ट केली.