केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना कोरोनाची लागण झाली झाली. बाबुल सुप्रियो यांच्यासह त्यांच्या पत्नीचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

मला आणि माझ्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. मला दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्यामुळे मी 26 एप्रिलला आसनसोलमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदान करू शकणार नाही, असे ट्वीट बाबुल सुप्रियो यांनी केले आहे.

खरे तर 26 एप्रिलला मला रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता होती, कारण तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी येथे निष्पक्ष निवडणुकीमध्ये विघ्न टाकण्याचे काम केले आहे. मात्र मी माझ्या खोलीमध्ये बसूनच ड्यूटी निभावेल आणि 9 पैकी 9 जागा जिंकण्यासाठी उमेदवारांना मानसिक रुपाने सहकार्य करेन, असेही बाबुल सुप्रियो यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.