
कोरोना नियंत्रणासाठी राज्यात चाचण्यांचे कमी केलेले दर, खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय, मास्कच्या किंमतीवर नियंत्रण, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यासारख्या योजना सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राबवल्या आहेत. कोरोनाकाळात सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून जे नावीन्यपूर्ण निर्णय आहे. हा आदर्श इतर राज्यांसाठी उपयोगी आहे अशा शब्दात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज महाराष्ट्राचे कौतुक केले.
आज की समीक्षा के दौरान मैंने सभी राज्यों से एक बार फिर #Testing, #Tracing व #Treatment की नीति का गंभीरता से पालन करने का आग्रह किया।
मैंने राज्यों से आने वाले समय में लोगों तक सुचारू रूप से #Vaccine पहुंचाने के लिए भी सभी तैयारियां पूरी रखने का आग्रह किया।@PMOIndia @MoHFW_INDIA pic.twitter.com/O9rI3q7SKA— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) November 11, 2020
देशातील विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला.
काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री
कोरोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यासारखे चांगले व अभिनव निर्णय महाराष्ट्राने घेतले आहे ते अन्य राज्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.
यादरम्यान ,महाराष्ट्र राज्याने कोविड नियंत्रणासाठी केलेल्या विवीध उपाययोजना बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच,राज्यशासनाने घेतल्या नावीन्यपूर्न निर्णयांचे मा.केंद्रीय मंत्रीमहोदयानी कौतुक केले. pic.twitter.com/WgYXhaX6dR
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 11, 2020
खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण
राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण मिळण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केली. त्यावर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले.
दिवाळीत खबरदारी
दिवाळी व हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार घेत असलेल्या कोरोनाविषयक खबरदारीबाबत राजेश टोपे यावेळी माहिती दिली. राज्यातील अॅक्टीव्ह केसेस कमी झाल्या आहेत. राज्याचा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकर निदान लवकर उपचारावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.



























































