महिला सक्षमीकरणासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले कृती दशक! उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 ते 1985  हे दशक ‘जागतिक महिला दशक’ म्हणून घोषित करण्यात केले होते.  त्यानंतर आता 2020 ते 2030 हे महिला सक्षमीकरण आणि ‘लिंगभाव समानते’साठी कृती दशक म्हणून स्वीकारण्यात आले आहे. याविषयीचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत याविषयी निर्णय घेण्यात आल्याची माहिती विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांना दिली सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.

महिलांना प्रत्येक क्षेत्रात 2030 पर्यंत पन्नास टक्के प्रतिनिधित्व असायलाच हवे, ही यामागे संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका असल्याचे नीलम गोर्‍हे यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघाचे सेक्रेटरी जनरल यांनी महिलांनी सर्वच क्षेत्रात नेतृत्व करायला हवे अशी भावना व्यक्त केली. शासकीय, बोर्ड रूम , हवामान संदर्भातील वाटाघाटी असो सर्वच क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. महामारीच्या काळातही महिला नेतृत्वाने अनेक पातळ्यांवर आपली जबाबदारी अधिक प्रभावीपणे पेलली आहे. तसेच त्यांनी ही लिंगभाव समानतेची-महिलांच्या लिंगभाव अधिकाराची चळवळ तळागाळापर्यंत झिरपायला हवी असल्याचे सेक्रेटरी जनरल यांनी म्हटल्याचे नीलम गोर्‍हे म्हणाल्या.