खळखळून हसणारा इमोजी सोशल मीडियावर हिट

स्मार्टफोनमुळे सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलाय. चॅटिंग करताना बरेच जण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आकर्षक इमोजी वापरतात. जगभरातील युजर सर्वाधिक कोणत्या इमोजीचा वापर करतात याबाबत नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले होते. युजरची सर्वाधिक पसंती आनंदाश्रूसह खळखळून हसणाऱया इमोजीला असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. दुसऱया क्रमांकावर हार्ट इमोजी असून हार्ट आईज इमोजी तिसऱया क्रमांकावर आहे.

मिशिगन युनिव्हर्सिटी आणि पिकिंग युनिव्हर्सिटीने 212 देशांच्या 4.27 कोटी मेसेजच्या आधाराकर हे सर्वेक्षण केले होते. रिसर्चनुसार प्रेंचमधील लोक हार्ट इमोजीचा सर्वाधिक वापर करतात. अमेरिकन आणि रशियातील युजरची पहिली पसंती हसणाऱया इमोजीला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या