जालन्यात मंठा शहरात घरासमोर उभा असलेला पिकअप अज्ञाताने पेटविला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील मंठा शहरातील टावर गल्ली येथे 16 जून रोजी मध्यरात्री पिकअप वाहन जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंठा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंठा शहरातील विजय विलास गोंडगे यांनी त्यांच्या भावाच्या घरासमोर उभा केलेल्या पिकपला रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने पिकअप पूर्णता जळून नुकसान झाले आहे. याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात आकस्मात जळीत दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड करत आहेत.