
व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात फिटनेसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शहरातीलच नव्हे, तर कानाकोपऱयांमधील जनतेची पावले जिमकडे वळू लागली. दैनंदिन व्यायाम करून निरोगी शरीर ठेवणे ही काळाची गरज बनू लागली, पण कोरोना व लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यापासून जिम तसेच फिटनेस सेंटर बंद होते. त्यामुळे अपुऱया व्यायामामुळे शरीराचे वजन वाढणे, पोट सुटणे अशा गोष्टी घडू लागल्या. जिम मालक, पर्सनल ट्रेनिंगद्वारे कमाई करणाऱया खेळाडूंना आर्थिक चणचण भासू लागली. त्यामुळे लवकरात लवकर जिम सुरू व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येऊ लागली. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जिम व फिटनेस सेंटर सुरू करायला दसऱ्यापासून परवानगी देण्यात आली आणि सर्वत्र आनंदाला उधाण आले. जिम तसेच फिटनेस सेंटरच्या मालकांनी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे काwतुक करीत आभारही मानले.
खेळाडूंना आता व्यायाम करता येईल
महाराष्ट्र सरकारने जिम व फिटनेस सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आनंद गगनात मावेनासा झाला. दररोज व्यायाम करणाऱया क्लाएंटकडून सातत्याने विचारणा होत होती. घरी राहून प्रॉपर व्यायाम करताच येत नाही. त्यामुळे तेदेखील पंटाळले होते. आता या सर्वांनाच जिममध्ये जाऊन व्यायाम करता येणार आहे. तसेच आता खेळाडूंनाही अधिपृतपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करता येणार आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरलीय, असे जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे महासचिव चेतन पाठारे यांनी दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना सांगितले.
तीन ते चार महिन्यांचा अवधी लागेल
जिम व फिटनेस सेंटर चालवणारे सर्वच सज्ज झाले होते. आज ना उद्या आम्हाला जिम, फिटनेस सेंटर सुरू करण्याची परवानगी मिळेल हे माहीत होते. त्यामुळे जिम व फिटनेस सेंटरमध्ये येणाऱया सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. सॅनिटायझेशनपासून सर्व गोष्टींसह आम्ही तयार आहोत, पण मार्च महिन्यापासून सर्व ठप्प होते. त्यामुळे पूर्वपदावर यायला आणखी तीन ते चार महिने जातील. कारण इतक्या लवकर सर्वच जिममध्ये येणार नाहीत. तसेच या ठिकाणी गर्दीही करता येणार नाही, असेही चेतन पाठारे यावेळी म्हणाले.
पर्सनल ट्रेनिंग सुरू होईल
शरीरसौष्ठवपटू हे गरीब पुटुंबातून आलेले असतात. त्यामुळे या खेळामध्ये करीअर करण्यासाठी त्यांना पर्सनल ट्रेनिंगद्वारे आपला डाएटचा खर्च काढावा लागतो. आता अशा शरीरसौष्ठवपटूंना पर्सनल ट्रेनिंगलाही सुरुवात करता येणार आहे, असे चेतन पाठारे यांनी पुढे नमूद केले.
आगामी स्पर्धांसाठी योजना
महाराष्ट्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर आता खेळाडूंना व्यायाम करता येणार आहे, पण स्पर्धांबाबत या वर्षी विचार करता येणार नाही. पुढल्या वर्षी ज्युनियर स्पर्धा लुधियाना व फेडरेशन कप तेलंगणा येथे आयोजित करण्यात येणार आहे. सीनियर स्पर्धांबाबत अद्याप विचार केलेला नाही. 2021 सालामध्ये आशियाई चॅम्पियनशिप मालदीव येथे होईल. वर्ल्ड चॅम्पियनशिपबाबत अंतिम निर्णय झालेला नाही अशी माहिती पाठारे यांनी दिली.
रोजगाराचा प्रश्न मिटला
महाराष्ट्र सरकारकडून जिम व फिटनेस सेंटर सुरू करायला परवानगी मिळाली यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो. कोरोना आटोक्यात आल्यानंतर जिम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारकडून योग्य वेळी हे पाऊल उचलण्यात आले. आता या क्षेत्राशी संबंधित जवळपास 50 हजार जनतेच्या रोजगाराचा प्रश्न मिटला. त्यामुळे आम्ही सर्वांनीच दिवाळी, दसरा शनिवारीच साजरा केला असे उद्गार ‘वन अबोव फिटनेस’चे विश्वास शिंदे यांनी दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना काढले.


























































