तुमचे लग्न झाले नसेल आणि तुम्हांला कोरोना झाला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. स्वीडनच्या संशोधकांच्या एका संशोधनानुसार लग्न न झालेल्या पुरुषांना कोरोनामध्ये मृत्यूचा धोका अधिक असतो, असा दावा केला आहे. या अभ्यासानुसार तुम्ही पुरूष असाल, तुमचे उत्पन्न कमी असेल आणि तुमचे लग्न झाले नसेल तर कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याचे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
स्वीडनच्या स्टॉकहोम विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनानुसार महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मृत्यू दर अधिक असतो. त्यांच्या शरीराची बनावट आणि राहणीमान वेगळी असते. कमी शिकलेले, कमी वय असलेल्यांमध्ये आरोग्याच्या तक्रारी अधिक असतात. हे सर्व लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याने ही वेळ येते, असा दावा यावेळी संशोधकांनी केला आहे.
काय सांगतो अहवाल
- संशोधन करणाऱया स्वीडनच्या स्टॉकहोम विद्यापीठातील संशोधक स्वेन ड्रेफाल यांनी सांगितले आहे की, ही सर्व लक्षणे असतील तर कोरोनामुळे मृत्यूचा धोका अधिक बळावतो. हे संशोधन स्वीडनच्या नॅशनल बोर्ड ऑफ हेल्थच्या आकडेवारीनुसार करण्यात आले आहे. या आकडेवारीनुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये 20 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या तरुणांची संख्या अधिक आहे.
- स्वीडनच्या या संशोधनानुसार महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक आहे. जर तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हांला धोका कमी संभवतो. संशोधकांनुसार ज्या महिलांचे आणि पुरूषांचे लग्न झालेले नाही. त्यांना दीडपट अधिक धोका असू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. या अगोदर आलेल्या एका संशोधनानुसार एकल आणि लग्न न झालेल्यांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळेच त्यांचे मृत्यू दर देखील अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.