
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एका भाषणात बोलताना अखिलेश यांची तुलना क्रूर औरंगजेबाशी केली आहे. त्यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.
एका कार्यक्रमात आदित्यनाथ म्हणाले, ‘जो आपल्या बापाचा आणि काकाचा नाही झाला, तो तुम्हाला आपल्यासोबत घेण्याच्या बाता मारतो आहे. इतिहासात एक पात्र असे होऊन गेले आहे, ज्याने आपल्या बापालाच कैंदेत टाकलं होतं. म्हणूनच कोणी मुसलमान आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही. तसंच काहीसं समाजवादी पक्षासोबत जोडलं गेलं आहे’.
Jo apne baap aur chacha ka nahi hua, wo aapko apne sath jodne ki baat karta hai. Itihas mein ek paatr aate hain, kaise unone apne baap ko kaid karke rakha tha. Isliye koi musalman apne putra ka naam Aurangzeb nahi rakhta. Kuch aisa Samajwadi Party ke sath bhi joda gaya hai: UP CM pic.twitter.com/nkU3pGt06p
— ANI UP (@ANINewsUP) September 7, 2018
























































