
सामना प्रतिनिधी । मुंबई
उत्तर प्रदेशातून मांडूळ सर्प मुंबईत विकण्यासाठी आलेल्या दोघा तस्करांना मुंबई क्राइम ब्रँचच्या युनिट-५ च्या पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी ३० लाख किमतीचा मांडूळ हस्तगत केला आहे.
दोन इसम मांडूळ विकण्यासाठी माहीम निसर्ग उद्यानाजवळ येणार असल्याची माहिती युनिट-५ चे उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, उपनिरीक्षक पाटील, बंडकर व पथकाने त्या परिसरात सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार ते दोन इसम मांडूळ घेऊन निसर्ग उद्यानाजवळ येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. यूपीवरून आणलेला मांडूळ ते दोघे मुंबईत कोणाला विकणार होते याचा पोलीस तपास करीत आहेत.
































































