संजय चौहान निघाला इम्रान खान, लग्नानंतर महिलेवर धर्मांतरासाठी दबाव; मुलीवर केला बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादचे (Uttar Pradesh Love Jihad Case) आणखी एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुस्लिम व्यक्तीने आपला धर्म लपवून महिलेशी लग्न केले आणि यानंतर धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. तसेच आरोपीने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कारही केला. या प्रकरणी लखनौ पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहते.

‘इंडिया टूडे‘ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला (वय -35) गुडांबा पोलीस स्थानकांतर्गत (Gudamba Police Station) येणाऱ्या एका गावात राहते. पीडितेचा घटस्फोट झाला असून तिला आधीच्या पतीपासून एक मुलगी आहे. यानंतर तिची भेट आरोपी इम्रान खान याच्याशी झाले. त्याने आपले नाव संजय चौहान असून कानपूरचे रहिवासी असल्याचे सांगत पीडितेसोबत जवळीक वाढवली.

ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न केले. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी इम्रान खान याचे खरे रुप समोर आले आणि त्याने पीडितेवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने धर्मांतर करण्यास नकार दिला. याचा राग आल्याने इम्रानने तिला मारहाण केली आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार केला. यानंतर पीडितेने पोलीस स्थानकात धाव घेत इम्रानविरुद्ध तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून अनेक फेक ओळखपत्र आणि मदतान ओळखपत्र जप्त केली आहेत. या प्रकरणी डीसीपी दिवेश पांडे (DCP North Zone Devesh Pandey) यांनी सांगितले की, आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. अधिक चौकशीनंतर आम्ही आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.