
आसामच्या गुवाहाटीतील बोरगाव परिसरात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराचे स्कूटर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
उपेन रॉय असे मजुराचे नाव आहे. त्यांनी स्कूटरसाठी एक रुपया, पाच रुपये आणि 10 रुपयांची नाणी पिगी बँकेत जमा करण्यास सुरुवात केली होती. अनेक वर्षांनंतर त्यांनी पिगी बँकेची रक्कम मोजली. उपेनकडे दीड लाख रुपये जमा झाले होते. त्यानंतर रॉय पत्नीसह बाईक खरेदी करण्यासाठी पोहोचले. त्यांनी 90 हजारांची नाणी देऊन बाईक खरेदी केली.
ड्रीम स्कूटीचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर रॉय यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दुचाकी शोरूमच्या मालकांनी रॉय यांना निराश न करता नाणी घेऊन स्कूटर दिली. एवढेच नव्हे तर शोरूमने त्यांचा गौरव केला. शोरूममधील चार कर्मचाऱयांना नाणी मोजण्यासाठी काही तासांचा कालावधी लागला.



























































