सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. या आरक्षणावर राज्यसभेत दीर्घ चर्चा झाल्यानंतर सवर्ण आरक्षणाचे ऐतिहासिक विधेयक मंजूर झाले. 165 विरुद्ध 7 मतांनी हे आरक्षण मंजूर झाले. आता आरक्षण राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी जाणार आहे.
- आता आरक्षण राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी जाणार
- 165 विरुद्ध 7 मतांनी हे आरक्षण मंजूर
- लोकसभेपाठोपाठ सवर्ण आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर
- संसदेच्या दोन्ही सभागृहात आरक्षण मंजूर
Rajya Sabha passes the Constitution (124th Amendment) Bill, 2019 with 165 ‘ayes’. The bill will provide reservation for economically weaker section of the society. pic.twitter.com/JFLlIfwjOk
— ANI (@ANI) January 9, 2019
- खासगी क्षेत्रात आरक्षणाचे संशोधन फेटाळले
- 155 विरुद्ध 18 मतांनी ही मागणी फेटाळली
- विधेयकाला संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी फेटाळली
- सवर्ण आरक्षण विधेयक सुधारणांवर मतदान सुरू
- मंगळवारी राज्यसभेत हे विधेयक 323 विरुद्ध 3 मतांनी मंजूर झाले
- राज्यसभेत विधेयक मंजुरीसाठी 163 मतांची आवश्यकता
- सवर्ण आरक्षणावर राज्यसभेत मतदान प्रक्रिया सुरू




























































