उरण पंचायत समिती सभापतीपदी शेकापचे सागर कडू व उपसभापतीपदी शुभांगी पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरण पंचायत समितीच्या सभापतीपदी शेतकरी कामगार पक्षाचे सागर कडू (चाणजे गण) व उपसभापती पदी शुभांगी सुरेश पाटील (चिरनेर गण) यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

उरण पंचायत समितीचे सभापती नरेश घरत व उपसभापती वैशाली पाटील यांनी आपला कार्यकाळ संपल्यामुळे रिक्त झालेल्या उरण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया उरण पंचायत समितीच्या कार्यालयात पार पडली. उरण पंचायत समितीमध्ये शेकापाचे 5, शिवसेना 2 आणि भाजपा 1 असे संख्या बळ असल्याने सर्व सदस्यांनी उरणच्या विकासासाठी सभापती व उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडण्याचा निर्णय घेतला होता.

संगमेश्‍वर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे बंडा महाडीक बिनविरोध

उरण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी शेकापक्षाचे सागर कडू व उपसभापती पदासाठी शेकापक्षाच्या शुभांगी सुरेश पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी उरण पंचायत समितीच्या सभापतीपदी सागर कडू व उपसभापतीपदी शुभांगी सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.