
हिंदुस्थानींनी कधीच न बघितलेले स्टाईल हल्ली उर्फी जावेदमुळे बघायला मिळतात. एका पेक्षा एक विचित्र ड्रेस ही अभिनेत्री घालत असते त्यामुळे कायम ती चर्चेत देखील असते. पॅपाराझींना तर तिच्यामुळे दररोजचा एक वेगळा फोटो किंवा व्हिडीओ मिळतोच.
View this post on Instagram
नुकताच उर्फीने पुन्हा एकदा एक वेगळाच ड्रेस घातलेला. साधारणत कापडाचे कपडे घातले जातात. मात्र उर्फीने चक्क पिनांचे कपडे घातले होते. साडीसाठी वापरल्या जाणाऱ्या सेफ्टी पिनांचा हा ड्रेस तयार करण्यात आला होता. हा ड्रेस पारदर्शक असल्याने त्यात उर्फीने बिकीनी घातली होती.






























































