चंद्रावर होते ‘जादू’ चे शहर- नासाचा दावा

75

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

मानवाने चंद्रावर 20 जुलै 1969 साली पहीले पाऊल टाकले. या घटनेस पन्नास वर्ष झाल्याच्या निमित्ताने अमेरिकेची अंतराळसंस्था नासाने काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. हे फोटो चंद्रावरील असून यात चंद्राचा कधीही उजेडात न आलेला भाग दाखवण्यात आला आहे. या भागात एलियन्सचे वास्तव होते असा खळबळजनक दावा नासाने केला आहे. ‘द नासा आर्काइव: 60 इयर्स इन स्पेस’ यामध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे.

अपोलो- 11 या अंतराळयानातून नील आर्मस्ट्रॉन्ग, मायकल कॉलिन्स आणि अॅडविन एल्ड्रिन या तीन अंतराळवीरांना नासाने चंद्रावर पाठवले होते. चंद्रावर पोहचण्यास त्यांना आठ दिवस लागले. त्यावेळी नासाने चंद्राचे फोटो काढले होते. त्यातील अनेक फोटो नासाने प्रसिद्ध केले आहेत. त्या फोटोंमधील रहस्य नासाने आता उलगडले आहे. फोटोत चंद्रावरचा नेहमी अंधारात असलेला भाग दाखवण्यात आला आहे. तेथे अनेक ठिकाणी चौकोनी आकाराच्या टेकड्या दिसत आहेत. त्यावर एलियन्सचे वास्तव्य होते, असा दावा नासाने केला आहे. तसेच या फोटोंमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक ठिकाणी गडद काळ्या रंगाचे त्रिकोणही दिसत आहेत. तर काही ठिकाणी जहाजासारख्या आकृत्या या पोटोत दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते या फोटोवरून चंद्रावर लाखो वर्षांपूर्वी एलियन्सचे वास्तव होते हे अधोऱेखीत करण्यात आले आहे.  एलियन्सच्या अस्तित्वाचे ठसे येथेच असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. काही तज्ज्ञांनी आजही चंद्रावर एलियन्सचे वास्तव्य असल्याचा दावा केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या