
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
दहशतवादविरोधी लढय़ाच्या नावाखाली अमेरिकेकडून मिळणारा मदतीचा ओघ आटला आहे. अमेरिकी संसदेत एक विधेयक पारीत करण्यात आले असून त्यानुसार पाकिस्तानला देण्यात येणाऱया मदतीला मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळे आधी ६८०० कोटी रुपयांच्या घरात (७५ कोटी ते एक अब्ज डॉलर्स) मिळणारी ही मदत आता अवघ्या हजार कोटींवर (१५ कोटी डॉलर्स) आली आहे.
अमेरिकेच्या संसदेत बुधवारी नॅशनल डिफेन्स अथॉरायझेशन अॅक्ट २०१९ (एनडीएए) १० विरुद्ध ८७ मतांनी पारीत केला आहे. विधेयकाला कनिष्ठ सभागृहाने आधीच मान्यता दिलेली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया होईल. नव्या कायद्यानुसार पाकिस्तानची गतवर्षीची ७० कोटी डॉलर्सचे अर्थसाहय़ आता १५ कोटी डॉलर्सवर आले आहे. तथापि, या कायद्यातील हक्कानी नेटवर्क आणि लश्कर-ए-तोयबाविरुद्ध पाकिस्तानला केलेल्या कारवाईचे प्रमाणपत्र द्यावे लागायचे ते आता द्यावे लागणार नाही. अर्थात त्यामुळे दहशतवादविरोधी कारवाईसाठी अमेरिकेला पाकिस्तानवर कुठलाही दबावही टाकता येणार नाही. माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या कार्यकाळात सुरक्षा परिषदेवर असलेले अनीश गोयल यांनी ही माहिती दिली.



























































