अमेरिकेत प्राणिसंग्रहालयातील गोरिलांनाही कोरोनाचा संसर्ग

अमेरिकेत कोरोना महामारीचे थैमान सुरू असताना संसर्गाच्या विळख्यात प्राणीही येऊ लागले आहेत. अमेरिकेच्या सॅन दिएगो प्राणिसंग्रहालयातील काही गोरिला माकडांना कोरोनाची  बाधा झाल्याचे समोर आले आहे.

याआधी वाघ आणि मिंक या प्राण्यांना कोरोना झाल्याची नोंद असली तरी वानरवर्गी प्राण्यांमध्ये संसर्गाचे अमेरिकेतील आणि बहुधा जगातीलही हे पहिलेच उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.

प्राणिसंग्रहालयात एकत्र राहत असलेल्या आठ गोरिलांना कोरोनाचा  संसर्ग झाला असून इतर अनेकांना खोकला झाला आहे, असे प्राणिसंग्रहालयाच्या कार्यकारी संचालक लिसा पीटरसन यांनी सांगितले. प्राण्यांची काळजी घेणाऱ्य़ा कर्मचाऱ्य़ाकडून या गोरिलांना संसर्ग झाल्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्य़ाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

आपली प्रतिक्रिया द्या