
उन्हाळ्यात काकडीचा वापर आहारात केल्याने शरीराला थंडावा मिळतो. काकडीत ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व असून शरीराला आवश्यक अशा प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम असते. काकडीतील के जीवनसत्त्व हाडाच्या बळकटीसाठी उपयोगी आहे. प्रवासावेळी अनेक वेळा धूळ,माती उडाल्यामुळे चेहरा तेलकट होतो. यामुळे त्वचेवरील रंध्रे बंद होऊन त्वचेला ऑक्सिजन मिळण्यास अडथळा निर्माण होतो.यामुळे चेहऱ्यावर डाग, पुटकुळ्या येतात तसेच प्रखर उन्हाचा सतत त्रास झाल्याने त्वचा टॅन होते. यामुळे त्वचेच्या मूळ रंगात बदल होऊन त्वचा काळवंडते, तर अनेक वेळा चेहऱ्यावर मुरुमंही येतात. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी फळभाज्यांमधली काकडी उपयुक्त ठरु शकते.
काकडीत 95 टक्के पाणी असते. त्यामुळे शरीर आणि त्वचा हायड्रेटेड राहते. काकडीचा वापर त्वचेवर केल्यास त्वचेची जळजळ कमी होते. काकडीच्या फेसपॅकमुळे त्वचेचे लालसरपणापासून संरक्षण होते. हा फेसपॅक लावल्याने निस्तेज त्वचा तजेलदार व्हायला मदत होईल.
काकडीचा फेसपॅक कसा तयार कराल ?
1 चमचा कोरफड जेल, 1/4 टीस्पून किसलेली काकडी घ्या. काकडीचे फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम काकडी धुवून किसून घ्या. त्यानंतर 1/4 काकडी किसून घ्या. त्यामध्ये 1 चमचा कोरफड जेल घाला. हे दोन्ही पदार्थ मिसळून पेस्ट तयार करा. हे फेसपॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी चेहरा धुवून पुसून घ्यावा.त्यानंतर फेसपॅक घ्या आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. यानंतर ते चेहऱ्यावर सुमारे 15 मिनिटे लावून वाळवून घ्या.त्यानंतर साध्या पाण्याच्या साहाय्याने चेहरा धुवा. यामुळे ताजेतवाने आणि उत्साही वाटेल.त्वचेला डायड्रेटेड ठेवण्याचे काम काकडी करते. काकडीमुळे चेह-याचा रंग उजळतो.
या काकडीचे टोनर करण्यासाठी प्रथम काकडीचे साल काढून काकडी मिक्सरमधून बारीक करून तिच्यातील पाणी गाळणीने वेगळे करावे. हे पाणी स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून रोज दिवसातून दोन वेळा चेहऱ्यावर शिंपडल्यास चेहऱ्याचा पोत सुधारण्यासाठी मदत होते.
























































