
हिंदुस्थानात खर्च करण्याची पद्धत बदलत चालली आहे. देशात क्रेडिट कार्डने खरेदी करण्याची क्रेझ वाढल्याने क्रेडिट कार्डचा वापर मागील वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. देशात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या 11.86 कोटी इतकी आहे. 2026 या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डद्वारे 23.62 लाख कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे.
एसबीआय कार्डच्या आर्थिक वर्ष 2026 मधील आकडेवारीनुसार, किरकोळ खर्चाने आतापर्यंतची सर्वाधिक पातळी गाठली असून तो 3.54 लाख कोटींपेक्षा अधिक राहिला आहे. यामध्ये वर्षानुवर्षे 15 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. किरकोळ खर्चामध्ये ऑनलाईन खर्चाचा वाटा जवळपास 62.5 टक्के राहिला. यूपीआयवर सक्रिय असलेल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांपैकी जवळपास 77 बी टक्के ग्राहक आणि जवळपास 81 टक्के यूपीआय-क्रेडिट खर्च टियर 2 व टियर 3 शहरांमधून होत आहे. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरण्याकडे कल ग्राहक त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार प्रवास, आरोग्य, इंधन, जीवनशैली वेगवेगळी व्रेडिट कार्ड वापरण्याला पसंती देत आहेत.





























































