
फोनमध्ये व्हॉट्सऍप इन्स्टॉल करण्यासाठी फोन नंबर फार महत्त्वाचा असतो. फोन नंबर शिवाय व्हॉट्सऍप वापरताच येत नाही. पण बर्याच वेळेला आपल्याला व्हॉट्सऍपवर काम असतं आणि आपला नंबर आपल्याला शेअर करायचा नसतो. पण आता आपला फोन न नंबर न वापरताही व्हॉट्सऍप वापरता येणार आहे. इतकेच नाही तर आता लँडलाईनचा नंबर वापरूनही आपल्याला व्हॉट्सऍप वापरणे शक्य आहे.
- आपला फोन नंबर वापरण्या ऐवजी व्हर्च्युअल नंबर वापरून व्हॉट्सऍप वापरता येणार आहे. हा व्हर्चुअल नंबर TextNow या ऍप आणि वेबसाईटवर मोफत मिळतो. इथून व्हर्च्युअल नंबर घेऊ तुम्ही व्हॉट्सऍप वापरू शकता.
- इंटरनेटवर व्हर्च्युअल नंबर देणार्या अनेक वेबसाईट्स आणि ऍप्स आहे. त्यापैकी एक म्हणजे TextNow ऍप.
- TextNow च्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नंबर मिळवू शकता.
- TextNow वर जाऊन तुम्हाला एक फ्री अकाऊंट बनवावे लागेल.
- या ऍपवर लॉग इन केल्यावर तुम्हा अमेरिका आणि कॅनडाचे पाच क्रमांकांची एक यादी मिळेल. या पैकी तुम्ही कुठलाही नंबर निवडू शकता.
- या व्हर्च्युअल नंबरने तुम्ही इंटरनेवर फोन आणि मेसेजही करू शकता.
- त्यानंतर मोबाईलमध्ये व्हॉट्सऍप डाऊनलोड करा. त्यात तुम्ही निवडलेला नंबर व्हॉट्सऍमध्ये एंटर करा. कंट्री कोड म्हणून कॅनडाचा कोड टाका.
- हे करत असताना बाजूला TextNow ऍप सुरूच ठेवा.
- हा नंबर वापरून तुम्हाला ओटीपी येणार नाही, आणि ओटीपी शियाव व्हॉट्सऍप इन्स्टॉल करता येत नाही.
- अशा वेळी कॉल मीचा पर्याय वापरता येईल.
- ओटीपीची वैधता संपल्यानंतर व्हॉट्सऍपवर कॉल मी या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर TextNow ऍपवर एक मिस्ड कॉल येईल. TextNow ऍपवर आलेल्या एका व्हॉईसमेलवर एक ऑडियो मेसेज येईल.
- या ऑडियो मेसेजवर तुम्हाला ओटीपी येईल, हा ओटीपी व्हॉट्सऍपवर टाकायचा आहे.
- हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचे व्हॉट्सऍप सुरू होईल.
लँडलाईन नंबर वापरून व्हॉट्सऍप वापरा
- लँडलाईनचा नंबर वापरून तुम्ही व्हॉट्सऍप वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला WhatsApp Business वापरावे लागेल.
- प्ले स्टोअरवरुन WhatsApp Business डाऊनलोड करा.
- ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला एक फोन नंबर विचारला जाईल. या फोन नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.
- पण लँडलाईनवर मेसेजची सुविधा नसल्याने तुम्हाला ओटीपी येणार नाही.
- अशा वेळी ओटीपीची वैधता संपल्यानंतर व्हॉट्सऍपवर कॉल मीचा पर्याय निवडा.
- कॉल मीचा पर्याय निवडल्यानंतर लँडलाईनवर फोन येईल.
- लँडलाईनवर तुम्हाला एक कोड सांगितला जाईल, तो कोड म्हणजेच ओटीपी टाकल्यानंतर तुमचे व्हॉट्सऍप सुरू होईल.






























































