मोबाईल कंपनी नाही, ग्राहकच डेटाचा मालक – ट्राय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

मोबाइल ग्राहकाचाच त्याच्या मोबाइलमधील डेटावर पूर्ण अधिकार असतो , त्यात छेडछाड अथवा फेरफार करण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे बजावत हिंदुस्थानी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ( ट्राय ) सोमवारी डेटात हस्तक्षेप करणाऱ्या मोबाईल कंपन्यांना चांगलेच फटकारले. ग्राहकाच्या माहितीची गुप्तता पाळायलाच हवी असेही ट्रायने स्पस्ट केले.

सध्याचे नियम मोबाईल ग्राहकांच्या हिताचे पूर्ण संरक्षण करणारे नाहीत. ग्राहकांच्या माहितीची गुप्तता पाळली गेलीच पाहिजे. मोबाईल कंपन्या ग्राहकांच्या डेटावर नियंत्रण ठेवतात आणि त्यात बदलही करतात. तो त्यांचा अधिकार नाही. ग्राहकांच्या डेटासह माहितीची गुप्तता पाळण्यासाठी प्रभावी सुरक्षा चौकट तयार करायला हवी ,असे स्पष्टीकरण ट्रायचे अध्यक्ष आर एस शर्मा यांनी केले.