UP Result : उत्तर प्रदेशात भाजप आघाडीवर, ‘सपा’चाही चांगला जोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा कौल लक्षात घेता भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत असून पूर्ण बहुमताचा आकडा गाठेल असे चित्र आहे. आघाडी-पिछाडीचा कल पाहता भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. आता संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत चित्र असेच राहिल्यास भाजप उत्तर प्रदेशातील सत्ता कायम राखेल. 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजप 68 जागांवर पिछाडीवर आहे. तर समाजवादी पक्षाने मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे. आघाडी-पिछाडीचा विचार करता त्यांना गेल्यावेळच्या तुलनेत अधिकच्या 70 जागांवर आघाडी मिळाली आहे.

गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आघाडीवर आहेत.

तमकुहिराज मधून काँग्रेसचे अजय लल्लू पिछाडीवर आहेत.

औरईतून भाजपचे दीनानाथ भास्कर पुढे आहेत.

प्रयागराज पश्चिममधून भाजपचे उमेदवार सिद्धार्थनाथ सिंह पुढे आहेत.

प्रयागराज दक्षिणमधून भाजपचे नंद गोपाल नंदी, भाजपचे अजय पटेल हे दक्षिणेतून पुढे आहेत.

ललितपूर सदरमधून भाजपचे राम रतन कुशवाह पुढे आहेत.

देवरिया सदरमधून शलभ मणि त्रिपाठी पुढे आहेत.

अमेठीचे डॉ. संजय सिंह भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

गौरीगंजचे भाजपचे उमेदवार चंद्र प्रकाश मतियारी आघाडीवर.

फाजिलनगर सपाचे स्वामी प्रसाद मौर्य पिछाडीवर आहेत.

कैराना येथून सपाचे नाहिद हसन आघाडीवर आहेत.