‘मला खूप मारलं’, फाटलेला कुर्ता दाखवत रस्त्यावर झोपले भाजप आमदार; पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर सध्या एका भाजप आमदाराचा व्हिडीओ मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भाजप आमदार फाटलेला कुर्ता दाखवत रस्त्यावर झोपलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार धीरज ओझा यांचा आहे.

काय आहे प्रकरण?

धीरज ओझा हे उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यातील राणीगंज येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी आपल्याला प्रतापगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच पोलीस अधीक्षकांनी आपल्याला गोळी मारण्याची धमकी दिली असल्याचेही ते म्हणाले आहेत.

या व्हिडीओत आमदार धीरज ओझा हे डीएम निवासस्थानाबाहेर धरण्यावर बसल्याचे दिसत आहे. तसेच ते करत फाटलेला कुर्ता दाखवत ‘मला खूप मारलं आहे’, असं म्हणत रस्त्यावर झोपतानाही दिसत आहेत. ओझा याठिकाणी गोंधळ घालत असताना घटनास्थळी पोलीस देखील उपस्थित असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, मतदार यादीत नाव जोडण्यासाठी भाजपचे आमदार डीएम निवासस्थानाबाहेर धरण्यावर बसले होते. त्यावेळी डीएम आणि एसपी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या