
कोरोना संकटात कावड यात्रेला परवानगी देणाऱया उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला बुधवारी सर्वेच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. देशातील नागरिक पूर्णपणे हैराण आहेत. त्यांना समजत नाहीय की काय चाललेय? पंतप्रधानांनी कोरोनाच्या बाबतीत आम्ही अजिबात हलगर्जीपणा करू शकत नसल्याचे सांगितलेय. मग कोरोना संकटात कावड यात्रेला परवानगी का, असा संतप्त सवाल करीत न्यायालयाने योगी सरकारसह उत्तराखंड व केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यातच तिसऱया लाटेचाही धोका आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कावड यात्रा 25 जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयावर बुधवारी सर्वेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने ताशेरे ओढले. उत्तराखंडने सध्या कोणतीही यात्रा होणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रेला परवानगी दिली, हे आम्हाला आज वृत्तपत्रातून समजले. सध्याच्या कोरोना संकटात कावड यात्रा का भरवली जात आहे? एकीकडे कोरोनाच्या तिसऱया लाटेबाबत स्वतŠ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लोकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. अशावेळी राज्यांचे धोरण काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचेय. कावड यात्रेबाबत केंद्रासह उत्तर प्रदेश व उत्तराखंड सरकारने लवकरात लवकर आपली बाजू मांडावी, असे निर्देश देत न्यायालयाने पुढील सुनावणी शुक्रवारी घेण्याचे निश्चित केले.




























































